केरळ पूरग्रस्तांना “शिवनेरी’ची मदत

ओतूर- पुराने जबर तडखा दिल्याने उद्‌ध्वस्त झालेल्या देवभूमी अर्थात केरळमधील नागरिकांना मदत करण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून खानापूर (ता. जुन्नर)ची शिवनेरी शैक्षणिक संकुल सरसावले आहे. त्यांनी या पूरग्रस्तांना 21 हजार रुपयांचे 9 हजार बिस्कीट पाकिटे व रोख 30 हजर रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देऊन एकूण 51 हजारांची मदत केल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष शुभंकर कणसे यांनी दिली. एक सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून शिवनेरी शैक्षणिक संस्था सतत अग्रेसर असून यानंतर ही मदतीचा ओघ सुरू राहणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कणसे व सचिव डॉ. सरस्वती कणसे यांनी दिली.या पूरग्रस्तांसाठी संस्थेच्या प्रत्येक कर्मचारी वर्गाने योगदान असल्याची माहिती प्राध्यापक राजेंद्र मुरादे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)