केरळ पूरग्रस्तांना लाला अर्बन मदत देणार

वार्षिक सभेत ठराव : खासदार आढळराव पाटील यांचा सहकार भूषणने गौरव
नारायणगाव -उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या लाला अर्बन को. ऑप. बॅंकेची 44व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केरळ येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. यावेळी मा. खा. स्व. किसनराव बाणखेले सहकारभूषण पुरस्कार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रदान करण्यात आला, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष प्रल्हाद बाणखेले व उपाध्यक्ष ऍड. एन. एम. काळे यांनी दिली.

नारायणगाव येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद बाणखेले होते. यावेळी अक्षय आढळराव पाटील, जि. प. गटनेत्या आशा बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, सरपंच योगेश पाटे, मंचरचे सरपंच दत्ता गांजळे, माजी सरपंच आश्विनी शेटे, संचालिका मथुराबाई बाणखेले, ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब गुंजाळ, मनसुखलाल भंडारी, जगदीश फुलसुंदर, अशोक गांधी, विमल थोरात, सुनिता साकोरे, सचिन कांकरीया, नारायण गाढवे, नितीन लोणारी, डॉ. सचिन कांबळे, स्विकृत संचालक रामचंद्र पवार, डॉ. जैनुद्दीन मुल्ला, कैलास बाणखेले, मंगेश बाणखेले, जे. के. थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश ढोकळे, प्रदिप मोरे, प्रशासन अधिकारी राजेंद्र कष्टे, माजी संचालक जगन्नाथ कवडे, कुंडलिक थोरात, कैलास थोरात, सर्व व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

वार्षिक सभेमध्ये विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. चेअरमन प्रल्हाद बाणखेले यांनी बॅंकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. बॅंकेच्या ठेवी 315 कोटींच्या पुढे गेल्या आहेत. कर्जवाटप 188 कोटी, बॅंकेचे नेट एनपीए प्रमाण 5 टक्के आहे. बॅंकेला 1 कोटी 78 लाख रूपये नफा झाला असून बॅंकेस अ वर्ग मिळाला आहे. सभासदांना 8 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. बॅंकेच्या सभासदांमध्ये सहकार व सामाजिक क्षेत्रात काम करण्यात येणारे जेष्ठ सभासद शांताराम बापु घुमटकर, बाबुराव देवकर, लक्ष्मण गवळी यांच्यासह सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन ढोकळे यांनी तर सूत्रसंचालन सतिष जाधव यांनी केले. स्वागत अशोक गांधी, नितीन लोणारी यांनी केले तर संचालक सचिन कांकरीया यांनी आभार मानले.

कार्यालयांसाठी स्वतःच्या जागा घेणार

वार्षिक सर्वसाधारण सभेत शिरूर, चाकण, घोडेगाव व नारायणगाव येथील मुख्य कार्यालयासाठी जागा विकत घेण्याच्या ठरावाला सभासदांनी मंजुरी दिली. तसेच ज्या खात्यांमध्ये वसुली नाही अशा खात्यांबाबत संचालक मंडळाने सहकार खात्याच्या परवानगीने सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णयाला सभासदांनी एकमुखाने मान्यता दिली.

नारायणगाव: लाला अर्बन को-ऑप. बॅंकेच्या वतीने देण्यात येणारा मा. खा. स्व. किसनराव बाणखेले सहकार भूषण पुरस्कार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव अक्षय आढळराव पाटील यांनी पुरस्काराचा स्विकार केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)