केरळ पुरग्रस्तांसाठी पुणे बार असो. तर्फे 1 लाख 31 हजार रुपयांची मदत

पुणे- केरळ पुरग्रस्तांसाठी जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनतर्फे एक लाख 31 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट अध्यक्ष ऍड. सुभाष पवार यांच्या हस्ते नुकताच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपुर्द केला. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक विभागप्रमुख विठ्ठल बनोटे, बारचे उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. संतोष शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, ऍड. ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शिरीष शिंदे, ऍड. नितीन झंजाड, कार्यकारिणी सदस्य ऍड. रमेश राठोड, ऍड. लक्ष्मी माने, ऍड. पंजाब जाधव यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते. केरळमध्ये पुरामुळे मोठी जिवित आणि वित्तहानी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनतर्फे वकिलांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत वकिलांनी मदत केली आहे. वकिलांच्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कौतुक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)