कोरेगाव – कोरेगाव येथील शिवनेरी सहकारी बॅंकेकडून केरळ येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून 50 हजारांची मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश बॅंकेचे चेअरमन विजयराव चव्हाण यांनी नुकताच सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपूर्त केला.

केरळमध्ये नुकत्याच आलेल्या महाप्रलयामुळे या राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महापुरात शेकडो लोक मृत्युमुखी पडले असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या पूरबाधित जनतेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत कोरेगाव येथील शिवनेरी सहकारी बॅंकेने सामाजिक बांधिलकी जपत बॅंकेच्यावतीने 50 हजारांचा धनादेश नुकताच सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये सुपूर्त केला. यावेळी बॅंकेचे व्हा. चेअरमन विजयराव चव्हाण, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील, वरिष्ठ अधिकारी कैलास गाडे, विजय पाटील व मधुकर पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)