केरळ दौऱ्यासाठी 3 लाखांचा खर्च

पिंपरी – महिला आणि बालकल्याण समितीचे पाच सदस्य केरळ अभ्यास दौछयासाठी रवाना झाले आहेत. 8 ते 13 एप्रिल असा दौऱ्याचा कालावधी आहे. या दौऱ्यात नगरसेविकांना विविध उद्योगांची माहिती, त्यांची आखणी, बाजारपेठेची पाहणी करून दिली जाणार आहे. तसेच यशस्वी उद्योजकांची भेट घेऊन चर्चाही केली जाणार आहे.

महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य असणाऱ्या नगरसेविकांसाठी केरळ येथे 8 एप्रिल 2018 ते 13 एप्रिल 2018 या कालावधीत अभ्यास दौरा आयोजित करण्याबाबत 3 एप्रिल 2018 रोजी पत्राद्वारे कळविले आहे. या दौऱ्याच्या आयोजनासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने 4 एप्रिल 2018 रोजी पत्राद्वारे या अभ्यास दौऱ्याचा प्रति दिन कार्यक्रम आणि खर्च याबाबतचा सविस्तर तपशील दिला आहे.

या दौऱ्यामध्ये सहभागी झालेल्या नगरसेविकांना माहिती, शिक्षण आणि संवादाअंतर्गत विविध उद्योगांची माहिती, त्यांची आखणी, बाजारपेठेची पाहणी, यशस्वी उद्योजकांची भेट व चर्चा आणि उद्योगांना अभ्यास भेटी तसेच महिलांसाठी सरकारच्या आणि महापालिकेच्या विविध योजना राबवून महिलांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणे असा कार्यक्रम निश्‍चित केला आहे. त्यानुसार, केरळ अभ्यास दौऱ्याचे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यासाठी महिला – बाल कल्याण समितीच्या पाच सदस्या आणि संस्थेचा एक समन्वयक अशा प्रत्येकी सहा सदस्यांसाठी प्रति व्यक्ती 56 लाख रूपये खर्च झाला आहे. या सहा व्यक्तींसाठी एकूण 3 लाख 37 हजार रूपये इतका खर्च अपेक्षित असून त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)