केरळ आपदग्रस्तांसाठीच्या मदत साहित्याच्या ट्रकला मुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी

मुंबई: जैन इंटरनॅशनल संघटनेच्यावतीने केरळ येथील आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू व साहित्य असलेले पाच ट्रक येथून रवाना झाले. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखविली. या मदत साहित्यात केरळवासीयांसाठी बेडशीटभांडीऔषधेटॉवेलपांघरून आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यावेळी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कीकेरळच्या आपदग्रस्तांना मदतीचे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. केरळातील आपदग्रस्तांना मदतीसाठी महाराष्ट्रातील नागरिकांनी पुढे यावे. राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येत असून महाराष्ट्रातील वैद्यकीय पथक केरळात काम करीत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मदतीचे काम सुरू आहे. केरळच्या मुख्य सचिवांनी या पथकाची प्रशंसा केली आहे. संकटसमयी केरळवासीयांना मदत करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यानयावेळी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश दिला. या कार्यक्रमावेळी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे संस्थापक नयपद्मसागरजी महाराजअक्षय पद्मसागरजी महाराजआमदार मंगलप्रभात लोढाआमदार राज पुरोहित यांच्यासह जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)