केरळातील पूरस्थिती गंभीर 

राज्याला सर्व शक्‍य ती मदत करू – राजनाथ 
कोची: केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केरळच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. राज्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले व या राज्याला आवश्‍यक ती सर्व मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल असे ते म्हणाले. पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री पी विजयन यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याला आवश्‍यकत्या मदतीचे आश्‍वासन दिले. आज केंद्रीय गृहमंत्र्यांचे येथे आगमन झाले त्यावेळी राज्याच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधीत खात्याच्या मंत्र्यांनी राजनाथसिंह यांना या स्थितीची सविस्तर माहिती दिली. सध्या पावसाचा जोर काहींसा कमी झाला असला तरी राज्याच्या विविध भागातील पूराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध भागात मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यात 60 हजार नागरीकांनी आश्रय घेतला आहे. लष्कर, नौदल आणि हवाईदलाची मदत पथके या भागात नागरीकांच्या बचाव कार्यात गुंतलीआहेत. इडुक्की धरणाचे दरवाजे आज 26 वर्षांनंतर उघडण्यात आले आहेत. त्यामुळेही काही भागात पाणी शिरल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाने केरळ सह देशातील सोळा राज्यांत उद्या पर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानेही केरळच्या अनेक जिल्ह्यात पुन्हा अतिजोराचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करून रेड ऍलर्ट जारी केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)