केरळमध्ये शरणार्थींच्या छावण्यांमध्ये 10 हजार लोक

कोची – केरळमध्ये पेरियार नदीच्या खोऱ्यामधील पूरग्रस्तांच्या आश्रय छावण्यांमध्ये आतापर्यंत 10 हजार नागरिकांनी आश्रय घेतला आहे. एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये 78 आश्रय छावण्या उघडण्यात आल्या असून दोन मुख्य धरणांमधून पाणी सोडले जाण्याच्या पार्श्‍वभुमीवर संभाव्य परिस्थितीबाबत खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना या आश्रय छावण्यांमध्ये हलवले जात आहे. पारावूर, अलुवा, कानायान्नूर आणि कुन्नाथुनाद तालुक्‍यांमध्ये या आश्रय छावण्या उघडण्यात आल्या आहेत. या आश्रय छावण्यांमध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

पेरीयार नदीमध्ये धरणाचे पाणी सोडल्याने अनेक ठिकाणी सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर आलुवा येथे भगवान शंकराच्या कारक्किदाका वारु बाली या यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या यात्रेमध्येही अडथळे आले आहेत. हे मंदिर मंगालप्पुझा आणि पेरियार या दोन नद्यांदरम्यानच्या वाळूच्या बेटावर आहे. या दोन्ही नद्यांना पूर आल्याने मंदिरात पाणी घुसले आहे आहे. केरळमधील पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तैनात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)