केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळून 22 ठार

file photo

थिरुवनंतपूरम/ नवी दिल्ली – केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्यामुळे किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाच्यावतीने आज देण्यात आली. यापैकी इडिक्की जिल्ह्यात 11, मलाप्पुरम जिल्ह्यात 5, वायनाड जिल्ह्यात 3 आणि कोझिकोडमध्ये एक जण मरण पावल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

मुसळधार पावसामुळे केरळमधील विविध धरणांमधील पाणी पातळी कमाल मर्यादेपर्यंत गेली आहे. केरळमधील किमान 22 प्रमुख जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणांमधून सोडलेले पाणी कोची विमानतळाच्या धावपट्टीवर साचल्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही विमानांना उतरण्यासाठी विमानतळ दोन तासांसाठी बंद करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चेरुथोनी धरणातून पाणी सोडल्यावर पेरियार नदीच्या पात्रात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. केरळमधील बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चार तुकड्या चेन्नईवरून रवाना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या आंतर मंत्रीस्तरिय पथकही पूराचा आढावा घेण्यासाठी केरळला जात आहे. तर मदत आणि बचाव कार्यासाठी बेंगळूरु येथे लष्करी तुकड्यांना एकत्र केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)