केरळमध्ये महाप्रलय ; 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
तिरुअनंतपूरम – भीषण पूर संकटाचा सामना करणाऱ्या केरळमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. केरळमधल्या 14 पैकी 11 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. फक्त तिरुअनंतपूरम, कोल्लम आणि कासारागॉड या तीन जिल्ह्यांना रेड अलर्टमधून वगळण्यात आले आहे. या महापूरात आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

अजूनही असे अनेक भाग आहेत जिथे लोक अडकून पडले आहेत. अन्न-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला अन्न-पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी केरळची हवाई पाहणी केल्यानंतर 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

केरळच्या मदतीला पुणेकर धावले
पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले जाणार आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. तसेच गुजरातमधील रतलाम येथून 14 लाख 50 हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण 21 लाख 50 हजार लिटर पिण्याचे पाणी पुण्यातून केरळला होणार आहे.

पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्‍स येथे पाणी भरण्यात येत आहे. रतलामहून पाणी पुण्यात पोहचल्यानंतर शनिवारी दुपारी एक नंतर पाण्याच्या गाड्या केरळसाठी रवाना होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)