केरळमध्ये बचाव कार्यासाठी सॅटेलाईट फोनचा वापर

लष्कराने घेतला निर्णय : लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांची माहिती

पुणे – केरळ येथील पूरग्रस्त भागात काम करत असताना जवानांना अनेकदा कनेक्‍टिव्हिटीची समस्या भेडसावत होती. याची नोंद घेत यापुढे बचाव कार्यासाठी सॅटेलाईट फोनचा वापर करण्याचा निर्णय लष्करातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मदतीचा हात देताना लष्करापुढे “कनेक्‍टिव्हिटी’ची समस्या राहणार नाही, असा विश्‍वास दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी गुरूवारी व्यक्त केला.

एका कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सोनी बोलत होते. सोनी म्हणाले, केरळ येथील आपत्तीदरम्यान मुख्यालयाच्या जवानांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या कामाचा लष्कराला अतिशय अभिमान वाटतो. या आपत्तीतून लष्करालादेखील बऱ्याच गोष्टी शिकता आल्या, यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे “कनेक्‍टिव्हिटी’ची समस्या. आपत्तीग्रस्त परिसरात मदतकार्य करताना संवादाचा मोठा अभाव असतो. मोबाइलसारखी उपकरणे जास्त काळ काम करू शकत नाहीत. अशावेळी बचाव तुकड्यांसाठी सॅटेलाईट मोबाइल देण्याचा विचार लष्कराकडून केला जात आहे. त्याचबरोबर या क्षेत्राच्या पाहणीसाठी ड्रोनचा वापरदेखील केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अनेकदा नागरी क्षेत्रात मदतकार्य सुरू असताना उंच इमारतींमुळे लोकांपर्यंत आवाज पोहचत नाही. त्यामुळे अडकलेल्या लोकांना शोधण्यात विलंब होतो. यावर उपाय म्हणून पुढील काळात आवाजाचे अधिक तीव्रतेची उपकरणे वापरली जातील. एकूणच अशाप्रकारच्या बचाव कार्यादरम्यान येणाऱ्या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मात करत अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न लष्कराकडून केला जाणार आहे.

बचाव तुकडीत असणार वैद्यकीय अधिकारी
लष्करातर्फे केरळ येथील बचावकार्यादरम्यान वैद्यकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती. मात्र, नागरिकांना हे मदत मिळण्यासाठी बहुतांश वेळा दिरंगाईचा सामना करावा लागत होता. या बचाव कार्यातील अनुभवांच्या आधारावर लष्कराच्या प्रत्येक बचाव तुकडीत एक लष्करी वैद्यकीय अधिकारी सामाविष्ट करणार असल्याची माहिती, लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी दिली. तसेच अजूनही मुख्यालयाच्या दोन वैद्यकीय तुकड्या केरळमधील बचाव कार्यासाठी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)