केरळमध्ये तरुणीने बलात्कारी साधूचे गुप्तांग कापले!

तिरुअनंतपूरम (केरळ) : अनेक वर्षांपासून सातत्याने बलात्कार करणाऱ्या नराधम साधूचे एका तरुणीने गुप्तांगच कापल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून साधूवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धक्कादायक म्हणजे या नराधम साधूला पीडित तरुणीच्या आईचीही साथ होती. हा साधू आपण बारावीत असल्यापासून बलात्कार करत होता, असा आरोप पीडित तरुणीचा आहे.
हा साधू शुक्रवारी रात्रीही बलात्काराचा प्रयत्न करत होता. त्यावेळी वैतागलेल्या तरुणीने थेट चाकू घेऊन, त्याचे जनेंद्रीयच कापले. गंगेसानंद असे या साधूचे नाव आहे. गुप्तांग कापल्यामुळे जखमी झालेल्या गंगेसानंदला तरुणीच्याच नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याचे गुप्तांग 90 टक्के कापले गेल्याचं डॉक्‍टरांनी सांगितले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करुन पुढील उपचार करण्यात येत आहेत. हा साधू गेल्या पाच वर्षांपासून या तरुणीच्या घरी येत होता. त्याचे तरुणीच्या आईशी अनैतिक संबंध होते. आईला हाताशी धरुन हा साधू मुलीवरही जबरदस्ती करत होता. तरुणी बारावीत असल्यापासून हा साधू तिच्यावर बलात्कार करत होता, अशी माहिती तीने पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)