केरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करा: राहुल गांधी 

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे असे आवाहन केले आहे. केरळमध्ये भयंकर पूरस्थिती उद्भवली आहे आतापर्यंत ३००हुन अधिक लोकांनी प्राण गमावले असून तब्ब्ल ३. १४ लाख लोक बेघर झाले आहेत. 
केरळ मध्ये उद्भवलेल्या या भयानक पूरस्थिती बाबत ट्विट करताना राहुल गांधी यांनी ‘प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केरळमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे लाखो लोकांचे जीवन अडचणीत सापडले आहे. कृपया आपण अजून वेळ वाया न घालवता केरळमध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे’ असे आवाहन केले आहे.     


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)