केरळमध्ये अतिवृष्टीमुळे २९ जणांचा मृत्यू तर ५४ हजारांहून अधिक नागरिक बेघर

तिरुअनंतपुरम – केरळला अतिवृष्टीचा चांगलाच तडाखा बसला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तब्बल २४ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. शिवाय आशिया खंडातील सर्वात मोठे इडुक्की या धरणाचेही २६ वर्षानंतर पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. दरम्यान, धरणग्रस्त भागांमध्ये हवामान विभागाने १४ ऑगस्टपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे.

केरळमधील अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूत्स्खलन होऊन जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढवण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने तब्बल ५४ हजारांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. पावसाचा फटका केवळ नागरिकांनाच बसला नसून केरळमधील वन्यजीव प्राण्यांचेही अस्तित्वही धोक्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भागात मदतकार्यासाठी एनडीआरएफ, नौदल, हेलिकॉप्टर, वायुसेना, कोस्ट गार्डसहित सैन्या दलालाही पाचारण करण्यात आले आहे. ‘मदत ऑपरेशन’द्वारे सैन्याने आतापर्यंत १९६४ कुटुंबातील १० हजार नागरिकांना ५०० मदत केंद्रात स्थलांतरित केले आहे. शिवाय प्रसिद्ध इडुक्की येथील लोकप्रिय हिल स्टेशन मुन्नार येथील एका रेस्टॉरंटमध्ये ६९ पर्यटक अडकलेले असून त्यात २० परदेशी पर्यटक होते. या सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

दरम्यान, आज सकाळीच केरळचे मुख्यमंत्री विजय पिनरई यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला. तर रविवारी (दि. १२) केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह केरळचा दौरा करणार आहेत. अतिवृष्टी पाहता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला साद देत कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी १० कोटी व तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी पाच कोटी रुपये केरळला मदत म्हणून जाहीर केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)