केरळमधील सर्व महोत्सव वर्षभरासाठी रद्द

पूरापाठोपाठ साथीच्या रोगांचा फैलाव

तिरुवनंतपुरम – केरळमधील भीषण महापूराच्या पार्श्‍वभुमीवर सरकारच्यावतीने आयोजित करण्यात येणारे सर्व महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभरासाठी रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये चित्रपट महोत्सव आणि पर्यटन कार्निव्हलसारख्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कार्यक्रमांचाही समावेश असणार आहे. या महोत्सवांच्या आयोजनासाठीचा निधी केरळमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे, राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे.

केरळ सरकारच्यावतीने आयोजित होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि कला आणि युवा महोत्सव डिसेंबरमध्ये असतो. त्याशिवाय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांना एक वर्षभरासाठी रद्द करण्यात आले आहे. शालेय कला महोत्सव, ओणम महोत्सव आणि नेहरू बोट रेस सारखे महत्वाचे महोत्सवही रद्द करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठीचा निधी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये वळवण्यात येणार आहे.

पूर ओसरल्यावर राज्यामध्ये अनेक ठिकाणी साथीचे रोग पसरायला सुरुवात झाली आहे. रॅट फिव्हरसारख्या रोगामुळे 29 ऑगस्टपासून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला आणि पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णयही घेतला. याशिवाय मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे सहाय्य देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)