केरळमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिंद्रन आरोपमुक्त

थिरूवनंतपूरम्‌ – येथील न्यायालयाने आज केरळचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ए.के.शशिंद्रन यांची लैंगिक छळवणुकीच्या आरोपातून मुक्तता केली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात परतण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

एका महिला पत्रकाराने शशिंद्रन यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला होता. मुलाखतीसाठी शशिंद्रन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेण्यासाठी गेल्यावर त्यांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप संबंधित महिला पत्रकाराने केला होता. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीवेळी तिने शशिंद्रन यांच्यावरील आरोप मागे घेतला. त्यामुळे स्थानिक न्यायालयाने शशिंद्रन यांना आरोपमुक्त केले. दरम्यान, लैंगिक छळवणुकीचा आरोप झाल्यामुळे अडचणीत आलेल्या शशिंद्रन यांनी मार्च 2017 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे आमदार थॉमस चंडी यांची मंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, जमीन बळकावल्याचा आरोप झाल्याने चंडी यांनाही नोव्हेंबर 2017 मध्ये राजीनामा द्यावा लागला. केरळमधील माकपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष सहभागी झाला आहे. या पक्षाच्या वाट्याला एक मंत्रिपद आले आहे. आता आरोपमुक्त झाल्याने शशिंद्रन यांचा लवकरच मंत्रिमंडळात फेरप्रवेश होईल, अशी चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)