केरळमधील पुरग्रस्तांना भिगवणकरांचा हात

भिगवण – केरळमधील पूरस्थितीतीमुळे अडचणीत सापडलेल्या बांधवांच्या मदतीसाठी भिगवणकर सरसावले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला असून, जवळपास अडीच लाखांची रक्कम जमा करून ती केरळला पाठवण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भिगवण रोटरी क्‍लबच्या वतीने मदतीचे आवाहन केले होते. केरळमधील बांधव हे येथे आलेल्या पुरामुळे अडचणीत आले आहेत, त्यांना मदत करणे हेच खरे रक्षाबंधन होईल. या भावनेतून जैन समाज बांधवांच्या वतीने जैन स्थानकात सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये भावांनी-बहिणींना दिलेल्या ओवाळणीमधून एक लाख रुपयांची रक्कम जमा झाली. ती रक्कम केरळमध्ये पूरस्थितीमध्ये अडचणीत असलेल्या बांधवांना प्रदान करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याचबरोबर रोटरी क्‍लबने केलेल्या आवाहनाला क्‍लबच्या सदस्यांसह अनेक नागरिकांनी मदत दिली, त्यामध्ये 75 हजारांची रक्कम जमा झाली, त्याचप्रमाणे भिगवण मेडिकल असोसिएशनच्या वतीने सुमारे सत्तर हजार रक्कम जमा केली. यावेळी रोटरीचे अध्यक्ष कमलेश गांधी, सचिन बोगावत, महेश शेंडगे, संपत बंडगर, प्रदीप वाकसे, रियाज शेख, औदुंबर हुलगे, पप्पू भोंग, थॉमस मथाई, नामदेव कुदळे, संजय खाडे, प्रवीण वाघ,डॉ. अमोल खानावरे, केशव भापकर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)