केरळमधील पावसाचा वाहन विक्रीवर परिणाम

मारुती सुझुकी कंपनीच्या विक्रीत 3.4 टक्‍के घट

उत्सवामुळे आगामी काळाबाबत कंपन्या आशावादी

नवी दिल्ली: विविध सणांच्या हंगामाची सुरुवात करणाऱ्या ऑगस्टमध्ये आघाडीच्या वाहन कंपन्यांना विक्री घसरणीला सामोरे जावे लागले आहे. मारुती सुझुकीची वाहन विक्री यंदा रोडावली आहे. तर ह्युंदाई मोटर इंडियात किरकोळ वाढ नोंदविली गेली आहे.

आघाडीच्या दुचाकी कंपन्यांनाही अवघ्या एक अंकी वाहन विक्रीतील वृद्धीवर समाधान मानावे लागले आहे. चलन अस्थिरता तसेच कच्च्या मालाची आयात महाग झाल्याने अनेक कंपन्यांनी त्यांची विविध वाहने गेल्या महिन्यातच महाग केली होती.
तसेच सप्टेंबरपासून विम्याबाबत झालेल्या बदलाचाही विपरीत परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे. केरळमधील ओल्या दुष्काळानेही देशाच्या वाहन क्षेत्रावर चिंता उमटल्याचे दिसून आले आहे.

गेल्या महिन्यात मारुती सुझुकीची वाहन विक्री 3.4 टक्‍क्‍यांनी घसरून 1,58,189 झाली आहे. तर कंपनीची देशांतर्गत वाहन विक्रीदेखील खाली येताना 2.8 टक्‍क्‍यांनी कमी होत 1,47,700 नोंदली गेली आहे. कंपनीची निर्यातही 10.4 टक्‍क्‍यांनी घसरून 10,489 वर आली आहे. ह्यंदाई मोटर इंडियाच्या वाहन विक्रीत 3.4 टक्‍क्‍यांनी घसरण होत ती गेल्या महिन्यात 61,912 झाली आहे. देशांतर्गत विक्री 2.8 टक्‍क्‍यांनी खाली येत 45,801 झाली आहे. या कंपनीची निर्यात 25.8 टक्‍क्‍यांनी वाढून 16,111 वर गेली आहे.

होंडा कार्स इंडियाने यंदा किरकोळ घसरण नोंदविताना ऑगस्टमध्ये 17,020 वाहन विक्री राखली आहे. देशाबाहेर कंपनीने अवघ्या 601 वाहनांची विक्री केली आहे. महिंद्र अँड महिंद्रची वाहन विक्री 14 टक्‍क्‍यांनी उंचावत 48,324 वर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत कंपनीने 42,207 वाहन विक्री नोंदविली होती. देशांतर्गत विक्री 15 टक्‍क्‍यांनी तर निर्यात 14 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. कंपनीच्या प्रवासी वाहनांची विक्री 2 टक्‍क्‍यांनी तर व्यापारी वाहनांची विक्री 25 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. टाटा मोटर्सची वाहन विक्री 27 टक्‍क्‍यांनी झेपावत 58,262 वर पोहोचली आहे. 125


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)