केरळमधील तरुणांना आयसिसमध्ये भरती करणाऱ्या महिलेला तुरुंगवास

नवी दिल्ली – केरळमधील तरुणांना आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये भरती करण्याचा कट आखणाऱ्या महिलेला  ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यास्मिन मोहम्मद झाहीद असे या महिलेचे नाव असून तिला ३० जुलै २०१६ रोजी नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली होती.

केरळमधील राष्ट्रीय तपास पथकाच्या (एएनआय) विशेष न्यायालयाने तिला आज  ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. केरळमधील तरुण-तरुणींना अफगाणिस्तानला पाठवल्याचा या महिलेवर आरोप आहे. आपल्या लहान मुलासह काबुलला जाताना तिला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)