केरळच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी हातात चाकू घेऊन राडा

नवी दिल्ली – दिल्लीतील केरळ भवनमध्ये एका व्यक्तीने हातात चाकू घेऊन राडा केल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांना भेटण्यासाठी त्याने हा प्रकार केला. त्याने विजयन यांना मारण्याची धमकिही दिली.

विमल राज असे या 46 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याला अटक करत त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार होत असताना मुख्यमंत्री विजयन हे केरळ भवनात उपस्थित होते. या व्यक्तीच्या एका हातात चाकू होता, तर दुसऱ्या हातात कागदपत्र होती. सुरक्षा रक्षकांनी मनाई करुनही या व्यक्तीने आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये घुसण्याचा प्रवेश करताच या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी बोलण्यात गुंतवित त्याला मागून येऊन पकडले आणि त्याचे हात बांधले.

-Ads-

या व्यक्तीच्या हातात मिळालेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहे, की तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. त्यामुळे त्याला उपचारासाठी दिल्लीतील शहादरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर रोडवरील केरळ भवन केरळ सरकारचे अतिथीगृह आहे. जिथे राज्याचे मुख्यमंत्री, आमदार आणि वरीष्ठ अधिकारी थांबतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)