केरळच्या पथकाने केली भागडी गावच्या विकासाचे कौतुक

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील आदर्शगाव भागडी या गावाला गेल्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा केरळ राज्यातील जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन विकास कामांचे कौतुक केले.
यशदा संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी केरळच्या पाहुण्यांनी भागडी गावाला भेट दिली होती. त्यांना येथील कामकाज पाहून आनंद झाला. त्यामुळे केरळ राज्यातील दुसरे पथकही भागडीला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी यशदाच्या अधिकारी अनिता महिरास, योगिता गावडे व ज्ञानशक्ती संस्थेच्या प्रकल्प समन्वयक निशा जाधव उपस्थित होत्या. केरळच्या पथकाने गावाने राबविलेल्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांची पाहणी केली. सिमेंट बंधारे, सलग समतल चर, फ्लॉवर, कोबी, फुले आदी पिकांचे मुरमाड माळरान जमिनीत आलेले उत्पादन पाहून केरळच्या पाहुण्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. भागडी आदर्शगाव योजनेचे अध्यक्ष रामदास आगळे, ज्ञानेश्‍वर उंडे, रामदास आगळे, रामदास गवारी, अनिल उंडे, लक्ष्मण गवारी, पांडुरंग भालेराव यांनी गावातील पाणलोट क्षेत्र विकासाची माहिती दिली. शिवारफेरी झाल्यानंतर प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट दिली. गावात झालेल्या बदलांची माहिती देणारी चित्रफित पाहुण्यांना दाखविण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)