केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी गणपत टेमकर

मंचर-जुन्नर, आंबेगाव, खेड केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी गणपत टेमकर आणि उपाध्यक्ष गणपत बाणखेले यांची निवड करण्यात आली. जीवन मंगल कार्यालय मंचर येथे जॅकचे ज्येष्ठ सल्लागार चंद्रशेखर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जुन्नर -आंबेगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी गणपत टेमकर यांची तसेच उपाध्यक्षपदी गणपत बाणखेले, सचिवपदी प्रसन्न भागवत, खजिनदारपदी संदीप निघोट व संघटनेच्या संघटकपदी सयाजी गांडेकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे सभासद व मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे तसेच जॅकचे सल्लागार ललित भाई पारेख, शांताराम मुंगसे, अतुल वाव्हळ, अनिल बलदोटा, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोल पारेख, सीएपीडीचे सदस्य व लायन्स क्‍लब शिवनेरीचे अध्यक्ष अजय चोरडिया व सीएपीडीचे सदस्य दिलीप खिंवसरा यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. संघटनेचे 650 पेक्षा अधिक सभासद जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्‍यात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)