केमिकलची टाकी कोसळली; कामगाराचा मृत्यू

वाकी – मिक्‍सिंग रूममधील माल स्ट्रेचरवर वाहून नेत असताना अचानक स्ट्रेचर स्टॅडला धडकल्याने रेझिंग केमीकलची टाकी खाली पडत असताना ती टाकी थांबविण्याचा प्रयत्नात तोल जावून सबंधित टाकी अंगावर पडल्याने अंबेजोगाईचा वीस वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना वराळे (ता. खेड) गावाच्या हद्दीतील टाटा ऑगोकॉम सिस्टीम लिमिटेड कंपोजीट या कंपनीत आज (बुधवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. योगेश समर्थ काळे (वय 20, सध्या रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, मूळ रा. अंबेजोगाई, ता. अंबेजोगाई, जि. बीड,) असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. कंपनीचे अधिकारी विष्णू लक्ष्मण पाटील (वय 53 रा. वाकड, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)