केबल डक्‍टसाठी पुन्हा होणार खोदाई

समान पाणी योजनेत डक्‍टच्या कामाबाबत साशंकता

पुणे – बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असून याठिकाणी चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील पाइपलाइनचे कामही करण्यात आले आहे. परंतू, हे काम करताना केबल डक्‍टचे काम न केल्याने येत्या काही महिन्यांत या रस्त्यांची पुन्हा खोदाई करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, डक्‍ट टाकण्याबाबत महापालिका प्रशासनाचा निर्णय होत नसल्याने हे काम डक्‍टविनाच होणार असल्याचे चित्र आहे.

शहरातील समान पाणी पुरवठा योजनेसोबतच केबल डक्‍टचे काम केले जाणार आहे. या योजनेचे काम सुरू करण्यासाठी सल्लागार कंपनीच्या सल्ल्यानुसार हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी 110 कि.मी.च्या पाइपलाइनच्या कामाचा आराखडा तयार केला असून पथ विभागाकडे रस्ते खोदाईच्या परवानगी मागितली आहे. परंतू, खोदाईचे धोरण ठरले नसल्याने अद्यापही या कामाला परवानगी मिळालेली नाही. मात्र पालिकेच्या पथविभागाच्यावतीने बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्याचे व परिसरातील काही रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरण, स्मार्ट पदपथ आणि सायकल ट्रॅकचे काम हाती घेतले आहे.

हे काम करत असताना चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या आराखड्यानुसार पाइपलाइनही टाकण्यात आली आहे. मात्र केबल डक्‍ट करण्यात आलेले नाहीत. यामुळे नव्याने करण्यात येणाऱ्या या रस्त्यांची पुन्हा खोदाई करावी लागणार असल्याची बाब समोर आली आहे.

यासंदर्भात पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी याला दुजोरा दिला आहे. पावसकर म्हणाले, “रस्ते खोदाईच्या परवानग्या देण्याचा निर्णय झाल्यानंतर समान पाणी पुरवठा योजनेतील पाइपलाइनच्या कामासाठी खोदाईला परवानगी देण्यात येईल. त्याचवेळी केबल डक्‍टच्या कामेही होतील. शहरात सुमारे 1800 कि.मी.ची पाइपलाइन टाकण्यात येणार असून मेन लाइनसोबतच घरांपर्यंतच्या सर्व्हिस लाईन्स टाकण्यासाठी रस्ते खोदाई करावी लागणार आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे आणि खोदाईच्या परवानगी देताना बारकाईने नियोजन केले जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)