केपी इलेव्हन, सुखाई एफसी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश!

ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक स्पर्धा

पुणे: केपी इलेव्हन, सुखाई एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करताना व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) तर्फे आयोजित ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेंट व्हिन्सेन्ट हायस्कूल आणि ढोबरवाडीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेच्या व्दितीय व तृतीय श्रेणीच्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात सुखाई एफसी संघाने सेंट्रल रेल्वे संघाचा टायब्रेकमध्ये 7-5 असा पराभव केला. डझनभर गोल झालेल्या या सामन्यात पूर्णवेळ 2-2 अशी बरोबरीची कोंडी झाली. सुखाईच्या तनिष्क बाथ व राजु राम यांनी गोल केले. तर, सेंट्रल रेल्वेच्या प्रभधा गायकवाड व ऋषीकेश शर्मा यांनी गोल करून संघाला 2-2 अशी बरोबरी गाठून दिली होती. टायब्रेकमध्ये सेंट्रल रेल्वे पुणेच्या क्रिस्तेफर दास, रूषीकेश शर्मा, गॅब्रियल डिकॉस्टा यांनी गोल केले तर, सुखाईकडून धनंजय मयाणे, विनय देवरुखकर, रोशन नायर, अर्थव चव्हाण, कॅलिस पेरीका यांनी गोल करून संघाचा विजय साकार केला.

अव्वल आणि प्रथम श्रेणीच्या उप-उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात चिराग सहानी याने केलेल्या चार गोलांच्या जोरावर आयफा स्काय हॉक्‍स्‌ संघाने असोसिएशन पुना सोशल संघाचा 5-2 असा सहज पराभव केला. मर्कंड हरदेव याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर इंद्रायणी एससी संघाने थंडरकॅटस्‌ संघाचा 2-0 असा सहज पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. तर, उपांत्यपुर्व फेरीच्या अन्य एका सामन्यात एड्‌वीन फलेरो व निर्मल छेत्री यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर केपी इलेव्हन संघाने डेक्कन इलेव्हन संघाचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

सविस्तर निकाल :

अव्वल आणि प्रथम श्रेणी ः उप-उपांत्यपुर्व फेरी –
आयफा स्काय हॉक्‍सः 5 (चिराग सहानी 10, 18, 23, 35 मि., सुरज कदम 55 मि.) वि.वि. असोसिएशन पुना सोशलः 2 (साबिर शेख 14, 60 मि.), इंद्रायणी एससीः 2 (मर्कंड हरदेव 29, 30 मि.) वि.वि. थंडरकॅटसः 0.
उपांत्यपुर्व फेरीः केपी इलेव्हनः 2 (एड्‌व्व्विववन फलेरो 48 मि., निर्मल छेत्री 53 मि.) वि.वि. डेक्कन इलेव्हनः 0.
व्दितीय आणि तृतीय श्रेणी : उपांत्यपुर्व फेरी – सुखाई एफसीः 7 (तनिष्क बाथ 3 मि., राजु राम 27 मि., धनंजय मयाणे, विनय देवरुखकर, रोशन नायर, अर्थव चव्हाण, कॅलिस पेरीका) टायब्रेकमध्ये वि. सेंट्रल रेल्वे पुणेः 5 (प्रभधा गायकवाड 26 मि., रूषीकेश शर्मा 52 मि., क्रिस्तेफर दास, रूषीकेश शर्मा, गॅब्रियल डिकॉस्टा);(गोल चुकविला-थांग पी.); पूर्ण वेळ 2-2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)