केपी इलेव्हन, आयफा स्काय हॉक्‍स्‌ संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक स्पर्धा

पुणे: केपी इलेव्हन आणि आयफा स्कॉय हॉक्‍स्‌ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) तर्फे आयोजित ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाक्‍यात प्रवेश केला.

कॅंपमधील सेंट व्हिन्सेन्ट हायस्कूल आणि ढोबरवाडीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अव्वल आणि प्रथम श्रेणीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केपी इलेव्हन संघाने दिएगो ज्युनिअर्स संघाचा सडन डेथमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. चुरशीने लढल्या गेलेल्या या सामन्यामध्ये सतिश पाटील याने पुर्वार्धात गोल करून दिएगो संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दिएगो संघाने ही आघाडी उत्तरार्धापर्यंत टिकवून ठेवली. अतिरिक्त वेळामध्ये केपी इलेव्हनच्या विश्‍वनाथन बेहेरे याने सुरेख गोल करून संघाला 1-1 अशी बरोबरी गाठून दिली.

पूर्णवेळ ही बरोबरीची कोंडी राहील्याने सामन्यात टायब्रेकपध्दतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकमध्ये दिएगो ज्युनिअर्सच्या स्टीव्हन झुझार्ट, केतन एस., जेफ्री परेरा, अव्देत देशपांडे, संकेत पाटील, शुभम महापाडी, केतन जे. यांनी गोल केले. केपी इलेव्हनच्या विकी पुजारी, आशिष आवटी, सद्दाम सय्यद, कैलाश परदेशी, आर. नाझप्रित, सतिश नवालदार, रोहीत मांगळे, निर्मल छेत्री यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आयफा स्कॉय हॉक्‍स्‌ संघाने इंद्रायणी एफसी संघाचा 3-1 असा सहज पराभव केला. पूर्णवेळ गोलशुन्य बरोबरी राहील्याने सामन्यात टायब्रेकपध्दतीचा अवलंब करण्यात आला. इंद्रायणी एफसी संघाकडून करमेंद्र एस. हा एकमेव गोल करू शकला. स्कॉय हॉक्‍स्च्या राज मोरे, सुरज कदम, इशान शर्मा यांनी गोल करून संघाचा विजय साकार केला.

सविस्तर निकाल 
अव्वल आणि प्रथम श्रेणी ः उपांत्यपुर्व फेरी –
इंद्रायणी एससीः 2 (कालमेंद्र सरोज 24 मि., मकरंद एच. 51 मि.) वि.वि. सांगवी एफसीः 1 (शुभम सावंत 8 मि.);
उपांत्य फेरीः 1) केपी इलेव्हनः 9 (विश्‍वनाथन बेहेरे 63 मि., विकी पुजारी, आशिष आवटी, सद्दाम सय्यद, कैलाश परदेशी, आर. नाझप्रित, सतिश नवालदार, रोहीत मांगळे, निर्मल छेत्री) टायब्रेकमध्ये वि.वि. दिएगो ज्युनिअर्सः 8 (सतिश पाटील 24 मि., स्टीव्हन झुझार्ट, केतन एस., जेफ्री परेरा, अव्देत देशपांडे, संकेत पाटील, शुभम महापाडी, केतन जे.); (गोल चुकविलाः सुरज एस.); पूर्ण वेळ 1-1,
आयफा स्कॉय हॉक्‍सः 3 (राज मोरे, सुरज कदम, इशान शर्मा) टायब्रेकमध्ये वि.वि. इंद्रायणी एफसीः 1 (करमेंद्र एस.);(कलपित भाटीया, जीवन रावत, झुबेर थागिरदार); पूर्ण वेळ 0-0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)