केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा: पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात 

पुणे: एन. श्रीराम बालाजी, एन विजय सुंदर प्रशांत या खेळाडूंना एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात पराभव पत्करावा लागल्याने पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत पाचव्या मानांकित जर्मनीच्या बेंजमीन हसन याने भारताच्या एन. श्रीराम बालाजीचा टायब्रेकमध्ये 7-6(7), 6-3असा पराभव करून अंतिम पात्रता फेरीत प्रवेश केला. हा सामना 1तास 39मिनिटे चालला. इस्राईलच्या बेन पेटेलने भारताच्या एन विजय सुंदर प्रशांतचा 6-0, 6-3असा सहज पराभव केला. हा सामना 57मिनिटे चालला. अतितटीच्या झालेल्या लढतीत जर्मनीच्या लुकास गेरचने नेदरलॅंडच्या मिलान नेस्टनचा 3-6, 6-4, 6-4असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

फ्रांसच्या माईक लेस्क्‍यूर याने जपानच्या रिओ नोगुचीचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपले आव्हान कायम राखले. नॉर्वेच्या विक्‍टर डुरासोविक याने इजिप्तच्या यौसेफ होसमचा टायब्रेकमध्ये 6-4, 6-7(7), 6-4असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात युक्रेनच्या डनयिलो कलचिंको याने उझबेकिस्तानच्या खुमयॉन सुल्तानोव्हचा 5-7, 7-6(3), 6-4 असा तर, इटलीच्या फ्रान्सिस्को विलार्दोने उझबेकिस्तानच्या संजर फैसिव्हचा 2-6, 7-6(5), 7-5असा पराभव करून अंतिम पात्रता फेरी गाठली.

सविस्तर निकाल – 

दुसरी पात्रता फेरी – बेंजमीन हसन (जर्मनी) वि.वि. एन. श्रीराम बालाजी (भारत) 7-6 (7), 6-3, लुकास गेरच (जर्मनी) वि.वि. मिलान नेस्टन (नेदरलॅंड) 3-6, 6-4, 6-4, माईक लेस्क्‍यूर (फ्रांस) वि.वि. रिओ नोगुची (जपान) 6-3, 6-2, बेन पेटेल (इस्राईल) वि.वि. एन विजय सुंदर प्रशांत (भारत) 6-0, 6-3, सेबस्तियन फॅंसीलव (जर्मनी) वि.वि. चीन सून लो (तैपेई) 6-3, 6-3, विक्‍टर डुरासोविक (नॉर्वे) वि.वि. यौसेफ होसम (इजिप्त) 6-4, 6-7 (7), 6-4, डनयिलो कलचिंको (युक्रेन) वि.वि. खुमयॉन सुल्तानोव्ह (उझबेकिस्तान) 5-7, 7-6(3), 6-4, फ्रान्सिस्को विलार्दो (इटली) वि.वि. संजर फैसिव्ह (उझबेकिस्तान) 2-6, 7-6(5), 7-5.

स्पर्धेतील मुख्य फेरीतील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे: 

राडू एल्बोट (माल्दोविया,101), रामकुमार रामनाथन(भारत,124), इलियास यमेर (स्वीडन,132), प्रजनेश गुन्नेस्वरण(भारत,144), मार्क पॉलमन्स (ऑस्ट्रीया, 145), जे क्‍लार्क(ग्रेट ब्रिटन, 174), आंद्रेज मार्टिन(स्लोवाकिया,189), हिरोकी मोरिया(जपान, 199).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)