केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा: विजय सुंदर प्रशांत, श्रीराम बालाजी यांची आगेकूच

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एन. विजय सुंदर प्रशांत, एन. श्रीराम बालाजी या दोन भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या एन विजय सुंदर प्रशांत याने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या सिद्धांत बांठियाचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(3), 7-5असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. 2तास 40मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या सामन्यात सिद्धांतने प्रशांतला कडवी झुंज दिली. पहिला सेट सिद्धांतने प्रशांतविरुद्ध 6-3 अशा फरकाने जिंकून सामन्यात आघाडी घेतली. पण त्यानंतर प्रशांतने जोरदार खेळ करत दुसरा सिद्धांतविरुद्ध 7-6(3)असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सामन्यात 5-4 अशा फरकाने आघाडीवर असताना आशियाई कुमार विजेता सिद्धांत बांठियाने मोक्‍याच्या क्षणी काही शुल्लक चुका केल्या, याचाच फायदा घेत प्रशांतने हा सेट 7-5 असा जिंकून विजय मिळवला.

-Ads-

भारताच्या एन. श्रीराम बालाजी याने कडवा प्रतिकार करत ऑस्ट्रियाच्या लूक सेवीलचा टायब्रेकमध्ये 6-7(7),6-4,7-6(4) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. इस्राईलच्या बेन पेटेल याने ग्रेट ब्रिटनच्या दुसऱ्या मानांकित लाईम ब्रॉडीचा 6-3, 6-3असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. जर्मनीच्या लुकास गेरच याने हंगेरीच्या तिसऱ्या मानांकित झोंबर पायरोसचा 4-6, 6-2, 6-3असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. इटलीच्या फ्रान्सिस्को विलार्डोने भारताच्या तेजस चौकुलकरचे आव्हान 6-7(), 6-1, 6-0असे संपुष्टात आणले. सातव्या मानांकित उझबेकिस्तानच्या संजर फेईझीवने सिद्धार्थ रावतला 6-1, 6-4असे पराभूत केले.

सविस्तर निकाल –
पहिली पात्रता फेरी – एन. श्रीराम बालाजी (भारत) वि.वि. लूक सेवील (ऑस्ट्रिया) 6-7(7),6-4,7-6(4), मिलान नेस्टन (नेदरलॅंड) वि.वि. ध्रुव सुनीश (भारत) 6-4, 6-3, माईक लेस्क्‍यूर (फ्रांस) वि.वि.अँटोनी इस्कोफर (फ्रांस) 7-5, 6-4, एन. विजय सुंदर प्रशांत (भारत) वि.वि.सिद्धांत बांठिया (भारत) 3-6, 7-6(3), 7-5, यौसेफ होसम (इजिप्त) वि.वि. नितीन कुमार सिन्हा (भारत) 6-3, 6-4, बेन पेटेल (इस्राईल) वि.वि. लाईम ब्रॉडी (ग्रेट ब्रिटन) 6-3, 6-3, डॅंनलो के (युक्रेन) वि.वि. जयेश पुंगलिया (भारत) 6-3, 6-4, फ्रान्सिस्को विलार्डो (इटली) वि.वि. तेजस चौकुलकर (भारत) 6-7(5), 6-1, 6-0, संजर फेईझीव (उझबेकिस्तान) वि.वि. सिद्धार्थ रावत (भारत) 6-1, 6-4, खुमयोन सुलतानोव (उझबेकिस्तान) वि.वि. कुणाल आनंद (भारत) 6-3, 6-0, बेंजमीन हसन (जर्मनी) वि.वि. सुरज प्रबोध (भारत) 6-1, 6-2, रिओ नोगुची (जपान) वि.वि. अभिनव शान्मूघम (भारत) 6-4, 6-4, लुकास गेरच (जर्मनी) वि.वि. झोंबर पायरोस (हंगेरी) 4-6, 6-2, 6-3.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)