केन ऍग्रोच्या विरोधात ठिय्या आंदोलन

रायगाव : केन ऍग्रोला निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटना.

शेतकऱ्यांची बिले त्वरित देण्याची मागणी

वडूज, दि. 14 (प्रतिनिधी) – रायगाव येथील केन ऍग्रो साखर कारखान्याकडून खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांची या वर्षाची उसाची बिले देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांसह कारखान्यावर ठिय्या आंदोलन केले.
काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बनपुरी व इतर काही गावातील शेतकऱ्यांची बिले त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. मात्र, येरळवाडी व इतर गावातील शेतकऱ्यांची बिले त्यांच्या खात्यावर जमा करण्यास कारखान्याने टाळाटाळ केली आहे. ती बिले अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाहीत.
तर ही बिले शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी बळीराजा संघटनेने यामागणी संदर्भात केन ऍग्रो या साखर कारखान्याच्या प्रशासनाला लेखी निवेदन दिले व सुमारे तासभर ठिय्या आंदोलनही केले. दरम्यान, केन ऍग्रोच्या प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दि. 20पर्यंत बिले खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या लेखी आश्वासनांनतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष योगेश जाधव, संदीप बुधावले या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.

कारखाना व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात दिलेल्या मुदतीत शेतकरी बांधवाच्या खात्यावर बिले जमा न झाल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन करणार आहे.
– योगेश जाधव

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)