केदार जाधवची शानदार शतक

रायपूर: दुसऱ्या डावात मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवच्या शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने छत्तीसगड विरुद्धच्या रणजी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर 3 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा जमविल्या आहेत. तरीदेखील महाराष्ट्र छत्तीसगडच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या 51 धावांनी मागे आहे. महाराष्ट्राने पहिल्या डावात 239 धावा केल्या होत्या तर छत्तीसगडने सर्वबाद 462 धावांचा डोंगर उभारून 223 धावांची आघाडी घेतली होती.

पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. स्वप्निल गुगळे 7 आणि चिराग खुराणा 12 धावांवर बाद झाल्याने महाराष्ट्राची स्थिती 2 बाद 24 अशी झाली होती. त्यानंतर केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड याने महाराष्ट्राचा डाव सावरला. गायकवाड 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर केदार जाधवने आपले शतक पूर्ण केले. त्याने 114 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्यात त्याने 15 चौकार आणि एक षटकार खेचला. अंकित बावणे 10 धावांवर नाबाद आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)