केदारी बालक मंदिरात “बालसंस्कार’वर व्याख्यान

नारायणगाव- ग्रामोन्नती मंडळ संचलित श्रीमती एस. आर. केदारी बालक मंदिरात गुरुवर्य रा. प. सबनीस यांच्या पुण्यतिथी सप्ताहनिमित्त “बालसंस्कार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे यांनी दिली. या कार्यक्रमाला मंडळाचे विश्‍वस्त डॉ. श्रीकांत विद्वांस, नंदा डांगे, ग्रामोन्नती मंडळाचे प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, बालक मंदिरचे अध्यक्ष अरविंद मेहेर, अनंत कुलकर्णी, इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, शिक्षण शास्त्र महाविद्यालय समितीचे अध्यक्ष रमेश जुन्नरकर, बालक मंदिर समितीचे सदस्य शशिकांत वाजगे, शाळेच्या उपमुख्याध्यापिका अरुणा साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मंगल डोंगरे यांनी गोष्टी रूपात विद्यार्थ्यांवर विविध संस्कार रुजवले. शाळेतील शिक्षिका योगिता औटी यांनी गुरुवर्य रा. प. सबनीस यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता तिसरीतील देवेश काळेने सबनीस यांच्या बद्दल माहिती सांगितली. इयत्ता पहिलीतील अर्णव पोखरकर याने गुरुवर्य सबनीस यांची वेशभूषा साकारली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता पारखे तर सुनिता बांगर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)