केदारी बालकमंदिरात चिमुकल्यांच्या रासलीला

नारायणगाव – ग्रामोन्नत्ती मंडळाच्या एस. आर. केदारी बालकमंदिरातील चिमुकल्या बालगोपाळांनी शैक्षणिक दहीहंडीचे नियोजन केले होते, अशी माहिती मुख्याध्यापिका सुनीत पारखे यांनी दिली. इयत्ता 1ली ते 3रीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण रासलीलेवर नृत्य केले. अनुज पोखरकर याने श्रीकृष्णाची माहिती व तेजस्वीनी साळवे हिने कृष्ण जन्माची कथा सांगितली. मंडळाच्या विश्वस्त नंदाताई डांगे यांनी गवळण सादर केली. राहुल दुधवडे यांनी कृष्णगीत सादर केले. 4थीतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. यावेळी मंडळाचे विश्वस्त श्रीकांत विधास, अध्यक्ष प्रकाश पाटे, अनिल मेहेर, रवींद्र पारगावकर, अरविंद मेहेर डॉ. आनंद कुलकर्णी, रमेश जुन्नरकर, शशिकांत वाजगे, मोनिका मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. सुनीता पारखे यांनी प्रास्तविक केले. वासंती गाडेकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)