केदारला दुखापत, कार्तिकचा बेभरवशीपणा

महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने वेळोवेळी मोलाची कामगिरी बजावताना भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. परंतु आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे केदारला या संपूर्ण मालिकेला मुकावे लागणार आहे.

केदारच्या गैरहजेरीमुळे भारतीय संघातील एका फलंदाजाची जागा रिकामी झाली आहे. परंतु ही जागा भरून काढण्यासाठी निवड समितीला योग्य पर्याय शोधावे लागणार आहेत. दिनेश कार्तिकच्या रूपाने भारतीय संघात तिसऱ्या यष्टीरक्षकाचा समावेश झाला आहे.

अर्थात कार्तिक हा संपूर्णपणे फलंदाजाच्याच भूमिकेत असतो. परंतु कार्तिकच्या खेळातील सातत्याचा अभाव आणि मोक्‍याच्या क्षणी समयोचित खेळी करून सामने जिंकून देण्याच्या किंवा “फिनिशिंग टच’च्या अभावामुळे संघव्यवस्थापनासाठी ती डोकेदुखी होऊन बसली आहे. आणि आता निवड समितीमध्येही दिनेश कार्तिकच्या समावेशावरून वादळ होण्याची शक्‍यता आहे. कार्तिकने अद्याप संधी गमावलेली नसली, तरी अन्य पर्याय झपाट्याने पुढे येत असल्यामुळे त्याच्यासाठी वेळ संपत चालली आहे हे खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)