‘केदारनाथ’ चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार ३ सप्टेंबर पासून

‘केदारनाथ’ चित्रपटाचे शुटिंग डेहराडुनजवळ 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या चित्रपटाद्वारे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्‍चर्सबरोबर टी सीरीज, क्रिअर्ज एंटरटेन्मेंट, गाइ इन द स्काय यांच्याकडून करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते अभिषेक कपूर आहेत.
“असे निर्माते मिळाल्यामुळे आमच्या चित्रपटाचे महत्त्व खूप वाढले आहे. त्यांच्या सहयोग व समर्थनामुळे मी त्यांचा आभारी आहे.” असे अभिषेक कपूर म्हणाले.

चित्रपटाची प्रेम कथा ही पवित्र केदारनाथ मंदिराच्या पार्श्‍वभूमीवर आधारीत आहे. ‘केदारनाथ’ चित्रपट खूप वेगळा आणि ‘केदारनाथ धाम’च्या पार्श्‍वभूमीवर आहे, असे टी सिरीजचे भूषण कुमार म्हणाले.
‘चित्रपटाची प्रेम कथा खूप भावनात्मक व संवेदनशील आहे,’ असे एकता कपूर म्हणाल्या.
2018 च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)