‘केदारनाथ’ चित्रपटाचे ‘काफिराना’ गाणं रिलीज

उत्तराखंडमध्ये 2013 साली आलेल्या भीषण पूराच्या पार्श्‍वभुमीवर सुशांत सिंह रजपूत आणि सारा अली खान यांच्या आगामी “केदारनाथ’ची प्रेमकथा आधारलेली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटांच्या पोस्टर रिलीज केले होते तर आज ‘काफिराना’ हे रोमांटिक गाणे रिलीज केले गेले. या गाण्यात सारा अली खान आणि सुशांत सिंह रजपूत या दोघांची केमिस्ट्री दिसून येत आहे. ‘काफिराना’ गाणं सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने गायले आहे.

-Ads-

या चित्रपटात पूराच्या दृश्‍यासाठी “केदारनाथ’मध्ये तब्बल 50 लाख लीटर पाणी वापरावे लागले आहे. एवढे पाणी 470 वॉटर टॅंकर भरून पाणी आणायला लागले होते. एवढे प्रचंड पाणी एका स्वीमिंग टॅंकसारख्या पाण्याच्या टाकीमध्ये भरून ठेवले गेले होते. ही प्रचंड टाकी खोपोलीमध्ये तयार केली गेली आहे. याच टॅंकमध्येच “केदारनाथ’चा एक सेटही तयार केला गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup: Thumbs up
15 :heart: Love
0 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)