‘केदारनाथ’ अडचणीत; पुजाऱ्यांकडून बंदीची मागणी 

सैफ अली खान, अमृतासिंग यांची मुलगी सारा अली खानचा पहिला सिनेमा “सिंबा’ ठरणार की “केदारनाथ’याचे कोडे अलिकडेच उलगडले. “केदारनाथ’ लवकर रिलीज होणार असल्याने तोइच तिचा पदार्पणाचा सिनेमा ठरणार आहे. मात्र हाच पदार्पणाचा ‘केदारनाथ’हा चित्रपट अडचणीत सापडण्याची चिन्हे आहे. टीजर रिलीज होताच, या चित्रपटाने वाद ओढवून घेतला आहे. टीजर पाहिल्यानंतर उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजा-यांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

केदारनाथ’ हा चित्रपट हिंदुंच्या भावना दुखावणारा आहे, असा दावा या पुजा-यांनी केला आहे. केदार सभा या केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष विनोद शुक्‍ला यांनी या चित्रपटाविरोधात आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा आहे. हिंदूंच्या भावना दुखावणा-या या चित्रपटावर बंदी लादली जावी अन्यथा आम्ही रस्त्यांवर उतरू, असे शुक्‍ला यांनी म्हटले आहे. रूद्रप्रयागच्या जिल्हा मुख्यालयासमोर या चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आले. यापूर्वी “पद्‌मावत’ आणि दक्षिणेत सनी लिओनच्या एका सिनेमाविरोधातही असेच आंदोलन सुरू झाले होते. “केदारनाथ’ला नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभुमीची जोड आहे. पण कथा प्रेमावरच आधारलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)