“केदारनाथ’मध्ये 50 लाख लीटर पाण्याचा पूर 

उत्तराखंडमध्ये 2013 साली आलेल्या भीषण पूराच्या पार्श्‍वभुमीवर सुशांत सिंह रजपूत आणि सारा अली खान यांच्या आगामी “केदारनाथ’ची प्रेमकथा आधारलेली आहे. या पूराच्या दृश्‍यासाठी “केदारनाथ’मध्ये तब्बल 50 लाख लीटर पाणी वापरावे लागले आहे. एवढे पाणी 470 वॉटर टॅंकर भरून पाणी आणायला लागले होते. एवढे प्रचंड पाणी एका स्वीमिंग टॅंकसारख्या पाण्याच्या टाकीमध्ये भरून ठेवले गेले होते. ही प्रचंड टाकी खोपोलीमध्ये तयार केली गेली आहे. याच टॅंकमध्येच “केदारनाथ’चा एक सेटही तयार केला गेला आहे.

सारा अली खान या पूरामुळे अडकलेली पर्यटक तर सुशांत हा पर्यटकांना पाठीवरून घेऊन जाणारा एक पिट्टू म्हणजे हमाल दाखवला गेला आहे. अशाप्रकारे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग यापूर्वीही काही सिनेमांमध्ये केला गेला आहे. करण जोहरचा “माय नेम इज खान’ आणि महेश भट्ट यांचा “तुम मिले’मध्येही पूराचे सीन शूट करण्यासाठी 200 टॅंकर भरून पाणी वापरले गेले होते. याशिवाय 2009 मध्ये प्रियदर्शनच्या “दे दना दन’मध्ये त्सुनामीच्या सीनसाठी तब्बल 700 टॅंकर पाणी वापरले गेले होते. या क्‍लायमॅक्‍सच्या सीनसाठी 80 लाख लीटर पाणी वापरले गेले असे म्हटले जाते आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)