केडगाव हत्या प्रकरणी तीन आरोपींची होणार नार्को टेस्ट

अहमदनगर : केडगावमधील दुहेरी खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपी संदीप गुंजाळ, संदीप ऊर्फ जॉन्टी बाळासाहेब गिऱ्हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळे या तिघांची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. या आरोपींकडून तपासाच्या दृष्टीने एकमेकांच्या माहितीला विसंगत अशी माहिती दिली जात असल्यामुळे नार्को टेस्ट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

-Ads-

याशिवाय केडगाव खून प्रकरणी कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास किंवा घटनेबाबत कोणास काही माहिती असल्यास ती माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून त्याला एक लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)