केडगाव-सारोळा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार

मनोज कोतकर ः आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाला यश
नगर – आमदार संग्राम जगताप व आ. अरुण काका जगताप यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पनात केडगाव अंबिका हॉटेलपासून ते सोनेवाडी, अकोळनेर ते सारोळा कासार या रस्त्यासाठी सुमारे 2.5 कोटी रुपये इतक्‍या निधीची तरतूद करण्यासाठी बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे या कामाला मोठा निधी प्राप्त झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही आता पूर्ण झाली असून, या लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
आ. संग्राम जगताप यांनी नगर शहराच्या विकासाबरोबर उपनगराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहराला व उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. केडगाव-अंबिका हॉटेलपासून ते सारोळापर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. सोनेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पेट्रोलचे टॅंकर जातात. तसेच या रोडवर गोडावून असल्यामुळे जड वाहतूक होते. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील दळणवळणाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण काका जगताप या रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केडगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहेत. मनीषा इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला कामाचा कार्यरंभ आदेश देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)