केडगाव भूकंपानंतर लोणीकरांची शहराकडे पाठ 

नगर- महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे नेतृत्व करणारे डॉ. सुजय विखे केडगाव येथील राजकीय भूकंपानंतर गायब झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फार्म देईपर्यंत डॉ.विखे नगरमध्ये थांबले. त्यानंतर ते एक आठवडा झाला तरी ते नगरला फिरकले नाही. केडगावमधील राजकीय उलथापालट डॉ. विखे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असल्याचे दिसत आहे.

महापालिका निवडणुकीत पहिल्यांचा कॉंग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. नेतृत्व फिरकत नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. डॉ. विखे यांनी आघाडीवर शिक्‍कामोर्ताब करून जागा वाटप केले. परंतू त्यानंतर दोन दिवसात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी डॉ. विखे यांचे कट्टर समर्थक कोतकर गटाने अचानक भाजपची उमेदवारी स्वीकारली. त्यामुळे कॉंग्रेसला ऐनवेळी उमेदवार आयात करावे लागले. या सर्व प्रकरणामुळे डॉ. विखे हताश झाले होते. त्यानंतर ते जे गायब झाले ते आज एक आठवडा झाला तरी ते नगरला आहे नाही. त्यांच्यावर या निवडणुकीची भिस्त ते गायब असल्याने कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
3 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)