केडगाव परिसरातील वितरिकांना आवर्तन सोडा

केडगाव – केडगाव परिसरातील बावीस आणि तेवीस वितरिकांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
चालू वर्षीचा उन्हाळा कडक जाणार असा अंदाज दिसून येत आहे. उन्हाळ्यात शेतीतील विहिरी आणि कूपनलिका यांची पाण्याची पातळी घटू लागली आहे.

आजमीतीला ऊस, उन्हाळी भुईमूग, कांदा अशी पिके शेतात उभी आहेत. त्यात पाणी कमी झाल्याने पीक जगविण्याची कसरत शेतकरी बांधवानी सुरू केली आहे. जमिनीत असणारी पाण्याची पातळी खोल गेली असून काही शेतकरी बांधवांनी विहिरी खोलीकरण सुरू केले असले तरी जमिनीत पाणी नाही. त्यामुळे विहिरी खोल खोदून उपयोग होत नाही. उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्यास पोटचाऱ्यांना पाणी फिरुन विहिरी आणि कुपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. नुकतीच कालवा समितीची बैठक झाली असून त्यामध्ये शेतीच्या पाण्याचे नियोजन केले आहे. चालू आठवड्यात परिसरातील केडगाव, बोरीपार्धी, नानगाव, वाखारी, आंबेगाव, दापोडी, खोपोडी या गावांच्या ग्रामदैवत यात्रांचा काळ आहे. त्यातच पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून वितरिकांना पाणी सोडण्यात आल्यास पाण्याची निकड भागण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)