केडगाव गावठाणात दिवसाही पथदिवे सुरूच

केडगाव- येथील गावठाणात रविवारी (दि. 27) दिवसाही पथदिवे सुरूच असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. रविवारी केडगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होती. या निवडणूक काळात विजेच्या खांबाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही, याबाबत आर्श्‍च व्यक्‍त केले जात आहे. गावठाणातील नागेश्वर मंदिर परिसरातील दिवे दिवसभर सुरूच होते. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी सध्या निवडणूक लढवीत असणारे तीन उमेदवार याच वार्डमधून निवडणूक लढवीत आहेत. शिवाय हाकेच्या अंतरावर मराठी शाळेत मतदान प्रक्रिया पार पडत होती. मतदारांची जुळवाजुळव करताना या सार्वजनिक कामाकडे मात्र कोणाचेच लक्ष नव्हते. त्यामुळे विजेचे दिवे दिवसभर सुरूच राहून वीज वाया गेली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)