केडगावात दगडफेक, दोन जण ताब्यात

नगर – नगर पुणे रस्त्यावरील केडगाव येथे मंगळवारी (दि.29)सायंकाळी 7 च्या सुमारास दगडफेक झाली.या प्रकारामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व एक जणास ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,केडगाव येथे पंचम वाईन्स समोर एकजण रिक्षा धुवत असतांना एक इसम त्याठिकाणी येवून उलटी करू लागल्याच्या कारणावरून त्या दोघात बाचाबाची झाली या बाचाबाचीचे पर्यावसान दोन जन्मावात दगडफेक होण्यात झाल्याने.त्यामुळे तेथे पळापळ झाली.या भांडणामुळे केडगाव परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांना याची माहिती मिळताच कोतवालीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे मोठ्या फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोन जणास ताब्यात घेण्यात आले असून,अन्य व्यक्तींची कसून चौकशी करण्यात येत आहे ताब्यात घेतल्या पैकी एक व अन्य एक जखमी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असल्याचे पो.नि.रत्नपारखी यांनी सांगितले.
पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे केडगाव मधील तणाव निवळला असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)