केडगावातील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान

केडगाव- येथील मोरया ढोल ताशा पथकातील सर्व मुला -मुलींनी एकत्र येत आज येथील स्मशानभूमीच्या परिसराची साफ-सफाई करुन स्वच्छता अभियान राबवले. ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी त्यांना याकामी मार्गदर्शन करुन इतर सदस्यांसमोर आदर्श निर्माण केला.
या पथकातील सर्व मुलांनी सफाई अभियान राबवत असताना येथील झाडांना मातीची आळी बनवून पाणी दिले. तसेच स्मशानभूमीतील कचरा गोळा केला. रत्नजीत जगताप, मानस गायकवाड, पप्पू गिरमे, प्रदीप जगताप, रोहन बारवकर, बंटी टिळेकर, स्नेहल हिंगणे, राजश्री ढेबे, पूनम राणे, ऐश्वर्या गोरे आदी मुले -मुली सहभागी झाल्या होत्या. हे पथक नेहमीच सामाजिक कार्यात भाग घेते. यापूर्वी त्यांनी वृक्षारोपण आणि संत तुकाराममहाराज पालखीचे स्वागत करताना त्यांनी ढोल-ताशा वाजवून केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)