केडगावातील शेळके दांपत्याला पी.एच.डी प्रदान

केडगाव- केडगाव (ता. दौंड) येथील प्रा. सागर विलास शेळके आणि त्यांच्या पत्नी प्रा.भारती सागर शेळके या दांपत्याला जयपूर, राजस्थान येथील विद्यापीठाने नुकतीच पी.एच. डी. प्रदान केली आहे. याबद्दल दौंड तालुक्‍याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते या दांपत्याचा सत्कार करण्यात आला. तसेच आमदार कुल यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शेळके दांपत्य सध्या शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालय, पुणे या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सागर शेळके यांनी “ग्लोबल वार्मिंग अँड इट्‌स सोशिओ लीगल इम्पॅक्‍ट ऑन क्‍लायमेंट ऑफ इंडिया’ या विषयावर संशोधन केले आहे. जागतिक तापमानवाढीच्या वातावरणावर होणारा परिणाम याचा विस्तृत अभ्यास शोधनिबंधात केला आहे. तर प्राध्यापक भारती शेळके यांनी “राइट तू एज्युकेशन कॉन्स्टिट्यूशनल अस्पेक्‍ट’ या विषयावर संशोधन केले आहे. आपल्या प्रबंधात त्यांनी शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून त्याची अंमलबजावणी व कायद्यातील तरतुदी याचा अभ्यास आपल्या संशोधनात केला आहे. या दोघांनाही विद्यापीठाच्या डॉ. पुष्पा बन्सल यांनी मार्गदर्शन केले, तर सहमार्गदर्शक म्हणून एम. एन. फड हे होते. या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्या डॉ. उज्वला शिंदे यांनीही शेळके दांपत्याला याबद्दल धन्यवाद दिले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)