केडगाववर “ड्रोन’ची नजर

मतदानाच्या दिवशी 200 सीसीटीव्हींची नजर : 134 संवेदनशील, तर 41 अतिसंवेदनशील बुथ

नगर –
केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस व महापालिका प्रशासनाने तेथील सर्व मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील म्हणून गृहित धरले आहेत. या मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने तिथे स्वतंत्र ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था केली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

नगर महापालिकेची निवडणूक महसूल, मनपा आणि पोलीस दल प्रशासनाने संवेदनशील म्हणून घेतली आहे. राजकीय वातावरण तापले असून, शहरात शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. केडगाव येथील पोटनिवडणुकीवेळी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्यानंतर लगचेच महापालिकेच्या निवडणुकीचे ढोल वाजू लागले. आता तर नऊ डिसेंबरला मतदान होत आहे.

-Ads-

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने केडगावमध्ये राजकीय भूकंप घडवून आणला. कॉंग्रेसचे उमेदवार भाजपमध्ये डेरेदाखल करून घेतले. त्यामुळे आता तर निवडणुकीला रंग भरला आहे. प्रशासकीय पातळीवर मतदान आणि मतमोजणीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. केडगाव पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीमुळे जिल्हा पोलीस दलाने या भागासह नगर शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रीत केले आहे.
केडगावमध्ये 21 मतदान केंद्र आहेत. 83 बुथ आहेत. यातील 48 केंद्र संवेदनशील आणि 37 अतिसंवेदनशील आहेत.

यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलाने तिथे 126 सीसीटीव्ही कॅमेरे उभे केले आहेत. महापालिकेची निवडणूक केडगावसाठी संवेदनशीलच आहे. ते लक्षात पोलीस दलाने केडगाववर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था केली आहे. हा कॅमेरे मतदान सुरू होण्यापासून ते मतदान झाल्यानंतर देखील काही तास केडगाववर फिरत राहणार आहे. म्हणजेच सुमारे 12 तास या कॅमेऱ्याची नजर केडगाववर राहणार आहे. त्याचदरम्यान नगर शहरावर देखील ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. केडगाव व नगरवर लक्ष ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे ठेवण्यात आले आहेत.

नगर शहरावर लक्ष ठेवणारा ड्रोन कॅमेरा हा दिल्ली दरवाजा आणि मुकुंदनगर भागावर देखील लक्ष ठेवणार आहे. केडगावची संपूर्ण मतदान केंद्र, मुकुंदनगर आणि शहरातील दिल्ली दरवाजा भागातील काही अशी एकूण 36 केंद्रावर 197 सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचे लक्ष राहणार आहे. शहरात 134 संवेदनशील, तर 41 अतिसंवेदनशील बुथ आहेत.

दिल्ली दरवाजा परिसर अतिसंवेदनशील
श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्याची पत्नी स्नेहा छिंदम ही अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे पोलिसांनी तोफखाना परिसरातील संवेदनशील मतदान केंद्रावर देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सुमारे 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबर येथे ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र
पोलीस ठाणे मतदाने केंद्र संवेदशील बुथ अतिसंवेदनशील बुथ सीसीटीव्ही कॅमेरे
कोतवाली 21 48 37 126
तोफखाना 14 68 चार 50
भिंगार कॅम्प 18 18 शून्य 21

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर, विशेष करून केडगाव येथे अतिरीक्त पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त असणार आहे. ड्रोन कॅमेऱ्यांबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शीघ्र कृती दल, दंगा काबू पथक, एसआरपीएफचे तुकडीचा बंदोबस्त असणार आहे.
– संदीप मिटके
शहर पोलीस उपअधीक्षक 

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)