केडगाव, बोरीपार्धीताला डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन

केडगाव- येथील दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ आणि ग्रामपंचायत बोरीपार्धी या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली. खरेदी -विक्री संघ या ठिकाणी संघाचे संचालक संतोष शेळके यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी केडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र गायकवाड, बापू कांबळे, रमेश बेळगल, नाना कोकरे, भगवान शेळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ग्रामपंचायत बोरीपार्धी या ठिकाणी उपसरपंच सोमनाथ गडदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच जयदीप सोडनवर, दत्तात्रय गडदे, ज्ञानदेव गायकवाड, गणेश मदने, सतीश टेंगल,े अंबादास फुले आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)