“केटी’च्या पाण्यामुळे पिकांनी संजीवनी

कुरवली- येथील नीरा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांना जीवदान मिळाले आहे.
इंदापूर तालुक्‍यातील पाण्यावाचून पिके जळून जात असताना कुरवलीसह परिसरातील पिकांना मात्र, बंधाऱ्याच्या पाण्यामुळे संजीवनी मिळाली आहे. या पाण्याबाबत शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यामुळेच एप्रिल अखेर नदीत पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे किमान मे अखेरपर्यंत शेतीसाठीची पाण्याची चिंता मिटली आहे. या भागातील पिकांच्या पाण्यासाठी नीरा डाव्या कालव्यातून आवर्तनासाठी अनेकदा रस्त्यावर उतरवून आंदोलन व निवेदन देऊन देखील प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्याने काही उपयोग झाला नाही. नदीत उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे कडक उन्हाळ्यात देखील जनावरांसह या भागातील पिकांना व महिलांना वापरासाठी पाणी उपलब्ध असल्याने दिलासा मिळाला आहे. या बंधाऱ्याच्या पाणी नियोजनासाठी गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन वर्गणी गोळा करून पाणी गळती व बंधाऱ्याचे ढापे फोडले जाऊ नये म्हणून रोंजदारी वरती कामगाराची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यामुळे बंधाऱ्यात किमान चार ढापे शिल्लक असल्याने पाणीसाठा उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे पाण्यावाचून होणारी फरफट थांबणार आहे. इंदापूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील अनेक बंधारे कोरडे पडले असताना नीरा नदीत पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीत उपोषण केले होते. या उपोषणादरम्यान काही शेतकऱ्यांची प्रकृती देखील खालावली होती; परंतु प्रशासनाने याची कोणतेही दखल घेतली नाही. तसेच नीरा डाव्या कालव्यातून पाण्याच्या आवर्तन बाबतीत योग्य नियोजन न झाल्याने या परिसरातील नुकत्याच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा घटना परिसरात घडत असताना कुरवलीतील शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यस्थापन केल्यामुळे या भागातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)