‘केजीएफ’मध्ये मौनी रॉयची वर्णी 

गोल्ड माफियांवर आधारित असलेला “केजीएफ’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेता यश पदार्पण करत आहे. प्रेक्षकांचा त्याच्या पहिल्याच ट्रेलरला भरभरुन प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आता बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयचादेखील सहभाग असणार असल्याचे समोर आले आहे.

या चित्रपटात मौनी कोणतीही भूमिका साकारणार नसून ती यात एका आयटम सॉंगवर थिरकणार आहे. ती यशसोबत या गाण्यात ठुमके लगावताना झळकणार आहे. जॅकी श्रॉफ आणि संगीत बिजलानी यांच्या त्रिदेव चित्रपटातील “गली गली मैं फिरता है’ या गाण्याचे हे रिक्रिएट व्हर्जन असणार आहे. “केजीएफ’ हा कन्नड चित्रपट असून हिंदीसह इतर 4 दाक्षिणात्य भाषांमध्येही तो प्रदर्शित होणार आहे.

-Ads-

या चित्रपटात यश, श्रीनिधि शेट्टी, राम्या कृष्ण, अनंत नाग, जॉन कोककेन, अच्युथ राव आदी कलाकारांची फौज आहे. प्रशांत नील यांनी दिग्दर्शन केले आहे. विजय किरागंदूर द्वारा निर्मित “केजीएफ’ला रायल बसरूय यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट येत्या 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मौनी रॉयच्या आयटम सॉंगमुळे तिच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)