केजरीवाल यांच्या कार्यालयाने चहापानावर केला एक कोटींपेक्षा जास्त खर्च

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता पुन्हा एकदा टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. कारण सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कार्यालयाने चहा-पानावर 1 कोटी 3 लाख 4 हजार 162 रूपये खर्च केला आहे. हल्द्वानीचे आरटीआय कार्यकर्ते हेमंत सिंह गोनिया यांनी फेब्रुवारी महिन्यात यासंदर्भात आरटीआयअंतर्गत माहिती मागविली होती. या आरटीआयअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.

आरटीआयतून समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2015-2016मध्ये चहा-पानावर कार्यालयाने 23.12 लाख रुपये खर्च केले. 2016-17मध्ये 46.54 लाख रूपये तर आर्थिक वर्ष 2017-18मध्ये चहा-पानावर 33.36 लाख रुपये खर्च करण्यात आला. 2016मधील 47.29 लाख रुपयातील 22 लाख 42 हजार 320 रुपयांचं बील सचिवालय कार्यालय आणि 24 लाख 86 हजार 921 रुपयाचं बील कॅम्प ऑफिसमध्ये आलं. दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री कार्यालयातून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मुख्यमंत्री कार्यालयातील अशा प्रकारच्या खर्चावर लगाम लावणं गरजेचं आहे. ज्या लोकांना जेवळही मिळण मुश्किल आहे अशांवर हा पैसा खर्च करायला हवा. चांगल्या कामासाठी सरकार आपल्या खर्चात कपात करेल याचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते गोनिया यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)